Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

## —-*नवचंडी साहित्य सामान लिस्ट*—- ##

चौरंग व पाट टोटल मिळून सात आठ किंवा जमल्यास 10 – 12 (  कारण पाठ म्हणताना पोथी साठी सुद्धा लागतील )

बसण्यासाठी आसन , चादर bedsheets 4

5 कलश व 5 ताम्हण

2 पळी व 2 फुलपात्र

2 समई व 2 निरांजन

गणपती , घंटी , शंख , देवी , टाक

हळद , कुंकू , अबीर , चंदन , अष्टगंध

कापूर , गुग्गूळ धूप , धुपस्टिक्स , अगरबत्ती पुडा ,

तेलवाती , फुलवाती , माचिस , 4 बटाटे , लिंबू

1/- 2/- रू. चे 51 काॅईन

पंचामृत : – दूध , दही , मध , साखर , तूप ( वाटीभर )

थोडी खीर (तांदूळाची ) , थोड़ा भात , दही

पिवळी मोहरी 5/- रु. ची

कमळाचे बी  5/- रु. ची

गव्हाच्या पिठात हळद टाकून केलेले पणती सारखे 17 दिवे

गोमूत्र , गंगाजल ,

प्रसादाला पेढे 250 ग्राम , थोड़े पूरण खीर

1 पंचा , 1 टाॅवेल , 1 नॅपकीन , दोन तीन ब्लाउज पीस ,

12 नारळ व मोठ्या सुपा-या 15 , छोटयां सुपाऱ्या 25

फळ 15 ( काही फळे डबल टीबल चालतील ) डाळिंब कम्पल्सरी , दोन डझन वेलची केळी , विड्याची पानं 100

खाण्याचे बदाम , काजू , खारीक , मनुका प्रत्येकी 51

( सुकामेवा ) मिक्स ड्रायफ्रूट 250 ग्राम ( हे देवाला व देवीच्या हवनाला सुद्धा लागणार आहे )

खोबरे वाट्या 8

51 हळकुंड , 51 वेलची , 51 लवंग , 2 जायफळ

तिळाचे तेल दिव्यासाठी

अत्तर व थोडा कापूस

5 जानवे जोड व हाताचा नाडा

होमासाठी लाकडे – ढलप्या 6 – 7 किलो

विटा 20 किंवा हवनकुंड

रेती , वाळू – 1 घमेली

समिधा बंडल – 11 , शेणी – 8

धोतर , उपरणे – शर्ट , पॅन्टपीस दान म्हणून

वेगवेगळी रंगीत फुले जास्त व 3 – 4 हार व 4 – 5 गजरे
तुळस , दुर्वा , बेलपत्र एक दोन बंडल सर्व

एक नवीन कलश व ताम्हण दान म्हणून जमल्यास

आंबा , वड , पिंपळ , जांभूळ , उंबर या झाडांची 8 – 8 पाने / डहाळी

बेलफळ

नवी काशाची वाटी / थाळी / भांडे

गहू 3 किलो व बारीक तांदुळ 8 किलो

तूर , मुग , चणे , मसूर , मटकी , चवळी , वाटाणा , साखर , भगर , शेंगदाणा , रवा , पोहे , साबुदाणा. हे सर्व नवग्रहांची धान्ये अक्खे किंवा डाळीच्या स्वरूपात प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पुडित पिशवीत

गूळ व खडीसाखर 150 ग्रॅम

उडीद डाळ 150 ग्रॅम

काळे तीळ सव्वा किलो

सफेद तीळ 250 ग्रॅम

गायीचे शुध्द तुप दीड किलो

साडी , चोळी व सौभाग्य अलंकार  दान

एक साड़ी देवीला ओटी म्हणून

हवन सामग्री पूडा व सर्वोषधी 50 ग्रॅम

जव 100 ग्रॅम , साळ 250 ग्रॅम

10 रू. च्या 15 नोटा व 50 रू. च्या 10 नोटा व 100 रू. च्या 4 नोटा

कोहळा व एक मोठी सुरी / चाकू / खड्ग

पळसाच्या पानांचे ( किंवा इतर जे शक्य असेल ते ) खोल ताटासारख्या 25 – 30 पत्रावळी व 25 – 30 द्रोण ,

रांगोळी व रंग

–**–**—–***——-***——***—-***—-***——-

((( वर सांगितलेले सामान निट व्यवस्थित आणावे , मात्रा कमी करू नये , गुरुजी सुद्धा बरेच सामान आनणार आहे जे यात लिहिलेले नाही )))

या व्यतिरिक्त घरातील – स्टील ची दोन तीन मोठी ताटे , पाच सहा वाटया , पाच सहा चमचे , दोन टोप भांडे वेगेरे लागू शकतात
सर्व साहित्य स्वच्छ करून ठेवावे , पेपर डिश आणून ठेवणे , त्यामध्ये फराळ् वेगेरे होउ शकतो , दोन तीन वेळा चहा – कॉफी – सरबत होउ शकते , गुरुजीना फराळ् म्हणून फळे – राजगिरा लाडू – केळाचे वेफर्स – साबूदाना बटाटा चिवड़ा असे लागेल , एकूण सहा सात गुरुजी असू शकतात …

* पुजेच्या आधीच्या दिवशीच् व पुजेच्या दिवशी सुद्धा सर्व घर गोमूत्र गंगाजल शिंपडून स्वच्छ करणे..
* पुजेच्या दोन दिवस आधिपासून सर्वानी आंघोळीच्या पाण्यात थोड़े गोमूत्र गंगाजल टाकून आंघोळ करणे ..
* पुजेला लागणारे ताम्बे पितळेची भांडी ( कलश – ताम्हण – समई वेगेरे ) तसेच स्टील ची भांडी वेगेरे सुद्धा स्वच्छ साफ करून ठेवणे ..
* दाराला हार , तोरण लावणे.. दारासमोर रांगोळी काढणे..
* पुजेच्या दिवशी उपवास असेल.. उपवासचे पदार्थ चालतील – वर सांगितले आहे
* पूजेच्या एक महीना आधिपासून व एक महीना नंतर कोणीच मांसाहार – चायनीज वेगेरे खाऊ नये ( घरात – बाहेर कुठेच नाही )

नवचंडी साहित्य यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!