आरती ज्ञानराजा

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-12-09 08:04:28
आरती ज्ञानरायाची आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।। लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।। कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी । नारद तुंबरूहो । सामगायन करी ।। प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रहचि केलें । राम जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ।।

Search

Search here.