अम्बा देवी आरती

आरती  > देवी आरती Posted at 2018-10-10 13:32:40
  अम्बा - देवी आरती सुखसदने शशिवदने अम्बे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने । सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें । भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १॥ जय देवी जय देवी वो जय अम्बे । कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदम्बे ॥ धृ ॥ मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं । कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं । रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी । चिद्गगगनाचा गाभा अम्बा वेल्हाळी ॥ जय... ॥ २॥ कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें । पीतांबर सुंदर कसियेला कांसे । कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे । पदकमळ लावण्ये अम्बा शोभतसे ॥ जय ...॥ ३॥ झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी । तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं । ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी । अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय... ॥ ४॥ अष्टहि भूजा सुंदर शोभतसे । झगझगझगझगझगति लावण्यगाभा । म्हगम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा । त्र्यम्बक मधुकर होऊनि वर्णितसे अम्बा ॥ जय... ॥ ५॥

Search

Search here.