अन्नपूर्णा स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > देवी स्तोत्र Posted at 2016-03-25 10:34:28
अन्नपूर्णा स्तोत्र श्रीमत शंकराचार्य भ्रमंती करत करत विजयनगर नामक नगरात आले. भर दुपारची वेळ होती स्वामी एक घरासमोर भिक्षा मागण्याकरता गेले. खड्या सुरात त्यांनी " ओम भवन्ति भिक्षान देहि| " म्हणून उभे राहिले. त्याचवेळी ती गृहिणी देवाला आर्तपणे आळवत होती...सांगत होती , की " एकवेळ मला उपाशी राहावे लागले तरी चालेल; पण माझे पती व पुत्र यांना अन्न दे. " अशी प्रार्थना चालू असताना स्वामींचे शब्द तिच्या कानावर गेले. तिच्या पोटात भीतीने खड्डाच पडला. घरात अन्नाचा कण नव्हता आणि घरासमोर अतिथी आला आहे.त्याच्याकडे रिक्त हस्ताने कस जाऊ ? अतिथीला विन्मुख पाठवावे लागत आहे याचे तिला अतीव दु:ख झाले ; पण साधा नमस्कार करायला काय हरकत आहे ? असा विचार करून ती बाहेर आली. व स्वामीना खाली वाकून नमस्कार केला आणि दु:ख असह्य होऊन ती रडू लागले. शब्दाने जे सांगता येणार नव्हते ती कृतीने बोलके झाले होते. आचार्यांना तिची दया आली.आणि गंभीर स्वरात म्हणाले, “ हे देवी, तुझे दु:ख मी जाणतो पण तू मुळीच काळजी करू नकोस. मी साक्षात अन्नपूर्णेला आवाहन करतो आणि तुझी करून कहाणी तिला निवेदन करतो.मग तुझ्या घरी अन्नपूर्णासदैव नांदेल .” असे म्हणून आचार्यांनी आर्ततेने प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ! साक्षात अन्नपूर्णा आपल्या सिद्धगण!सह त्यांच्यापुढे अवतीर्ण झाली आणि म्हणाली , “वत्सा, तुजप्रत कल्याण असो, तुझ्या स्तुतीने मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू खुशाल वर माग.” त्यावर आचार्य म्हणाले, “हे देवी, मी तुला आवाहन केले ते माझ्यासाठी नाही ; मी भिक्षाटणास निघालो आहे आणि म्हणूनच मी परत येई पर्यंत तू या घरात निवास कर .” “ तथास्तु.” असे म्हणून अन्नपूर्णादेवी घराचा उंबरठा ओलांडून आत गेली ती आत जाताच जिकडे तिकडे मधुर सुवास येऊ लागला . डोळे दिपतील असा प्रखर प्रकाश पसरला. आपल्या मुखावरील हात काढून गृहिणीने अन्नपूर्णा देवीला देव घरात नेले देवापुढे तांदळाची रास होती. देवीने तिला संगितले की “ आता ही रास कधीच संपणार नाही . बाहेर जाऊन त्या यतिला भिक्षा घाल , . त्याला नमस्कार कर , त्याचा आशीर्वाद : परंतु त्याला स्पर्श करू नकोस.. त्याचे पाय तुला दिसतील . त्याचे दर्शन घे आणि घरात परत ये. लवकर जा . || श्री लघु अन्नपूर्णा स्तोत्रम् || भगवति भवरोगात् पीडितं दुष्कृतोत्यात् । सुतदुहितृकलत्र उपद्रवेणानुयातम् । विलसदमृतदृष्ट्या वीक्ष विभ्रान्तचित्तम् । सकलभुवनमातस्त्राहि माम् ॐ नमस्ते ॥ १ ॥ माहेश्र्वरीमाश्रितकल्पवल्ली महंभवोच्छेदकरीं भवानीम् । क्षुधार्तजायातनयाद्दुपेत स्त्वान्नपूर्णे शरणं प्रपद्दे ॥ २ ॥ दारिद्र्यदावानलदह्यमानम् । पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये । कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये । त्वपादपद्मार्पितचित्तवृतिम् ॥ ३ ॥ दूत्थन्नपूर्णास्तुतिरत्नमेतत् । श्लोकत्रयं यः पठतीह भक्त्या । तस्मै ददात्यन्नसमृद्धिमम्बा । श्रियं च विद्दां च यशश्र्च मुक्तिम् ॥ ४ ॥ ॥ इति श्रीमद् शंकराचार्य विरचितम् श्री लघु अन्नपूर्णास्तोत्रम् संपूर्णम् ॥ पूर्वी जेवण करण्यापूर्वी हे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत असत. नंतर जेवायला सुरु करत त्यामुळे घरामध्ये धन धान्य समृद्धी नांदते अशी लोकांची धारणा होती.

Search

Search here.