छंद तुझा लागला गं

भजन - स्तुती Posted at 2018-10-11 18:25:32

छंद तुझा लागला गं

छंद तुझा लागला गं अंबाबाई नाद तुझा लागला भरजरीचा शालु गं अंबे भरजरीचा शालु । कशाने चुरगळला , गं अंबाबाई पालखीचा भार पडला ॥1॥ सव्वा मन गुगुळ अंबे सव्वा मन गुगुळ । आकाशी धुर गेला , गं अंबाबाई शंकर गुरु केला ॥2॥ नवरत्नांचा चुडा गं अंबे नवरत्नांचा चुडा । कश्याने तडतडला , गं अंबाबाई सोंगट्यांचा डाव रंगला ॥3॥ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं । शंकरासी सारीपाठ अंबाबाई खेळ गं ॥4॥ भरजरीचा शालु गं अंबे भरजरीचा शालु । सव्वा मन गुगुळ अंबे सव्वा मन गुगुळ । नवरत्नांचा चुडा गं अंबे नवरत्नांचा चुडा । सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं । शंकरासी सारीपाठ अंबाबाई खेळ गं ॥4॥ छंद तुझा लागला गं अंबाबाई नाद तुझा लागला ...

Search

Search here.