जय आरती पार्वतिकुमरा

आरती  > गणेश आरती Posted at 2018-01-20 05:51:26
गणपतीची आरती १ जय जय आरती पार्वतिकुमारा गणपती ओवाळूं । पंचही प्राणांच्या कर्पूरवाती ज्ञाना़ग्रे जाळू ॥ धृ.॥ ओंकार प्रणवाक्षरी बीजापासूनि ध्वनि उठली । ते हे माया त्रिगुणात्मकचि सगुंणत्वा आली ॥जय.॥१॥ पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तुं जैसा। दृष्टीगोचर नव्हसी कोणा गूळ गोडी तैसा ॥जय.॥२॥ निगुण ज्योति सगुणा आली पुंडलिकासाठी । विटेवर शोभे कटिकर उभा भीमेचे कांठी ॥ जय.॥ ३॥ ऎसी मूर्ति नित्यनिरंतर ध्यानी जे धरिती । संकट त्यांचे दूर करी तूं श्रीमंगलमूर्ती ॥ जय.॥ ४॥ वायुतानें ह्र्दयिं ध्यायिली जसि राघवमुर्ती । तसि हनुमंता तुझिया पायीं देई सद्‌भक्ती ॥ जय जय आरती पार्वति कुमारा. ॥५॥

Search

Search here.