Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

गणपति भजन स्तुती 1

गणनाथं गणनाथम् । ईश्वर पुत्रं गणनाथम् ।
गणनाथं गणनाथम् । गणपति भजरे गुणनाथम् ।
गणनाथं गणनाथम् । भजरे मानस सदा नित्यम् ।
विघ्न विनायक गणनाथम् । सिद्धि विनायक गणनाथम् ।
पार्वति पुत्रं गणनाथम् । मुक्ति प्रदायक गणनाथम् ।
मूषक वाहन गणनाथम् । मोदक हस्त गणनाथम् ।
शिव शिव गज मुख गणनाथम् । शिव गण वंदित गुणनाथम् ।
बुद्धि प्रकाशक गणनाथम् । सिद्धि विनायक गणनाथम् ।
गणनाथं गणनाथम् । गणपति भजरे गुणनाथम् ।
मंगलमूर्ति गणनाथम् । गणपति भजरे गुणनाथम् ।
गणपति भजरे गुणनाथम् ..। मंगलमूर्ति गुणनाथम् ..।

————————————

गणपति भजन स्तुती 2

वेद विनायक शरणं शरणम् । विघ्न विनायक शरणं शरणम् ।
नाद विनायक शरणं शरणम् । नाग विनायक शरणं शरणम् ।
बोध विनायक शरणं शरणम् । बुद्धि प्रदायक शरणं शरणम् ।
सिद्धि विनायक शरणं शरणम् । मुक्ति प्रदायक शरणं शरणम् ।

————————————

गणपति भजन स्तुती 3

विनायका विनायका पार्वति नंदन विनायका ।
विघ्नविनाशक सौख्यविदायक विश्वविभावक विनायका ॥

गौरीतनया विनायका शंकरपालित विनायका
गजवदना हे विनायका मूषकवाहन विनायका ।

पितृसद्भक्ता विनायका सुप्रसबुद्धि विनायका
विघ्नाधीश्वर विनायका विश्वाराज्ञा विनायका ।

मोदकहस्ता विनायका मोदविदाया विनायका
चंद्रोल्हात्सक विनायका शापितचंद्रा विनायका ।

पुनरुज्जीवन विनायका पूर्णकृपालय विनायका
दैवतरक्षक विनायका दानवसंहार विनायका ।

बाहुचतुष्का विनायका भावमनोज्ञा विनायका
पाशांकुशधर विनायका नटवरनाट्या विनायका ।

चंदनरंजित विनायका रक्ताम्बरधर विनायका
लम्बोदर हे विनायका वामनरूपा विनायका ।

नागाराकृत विनायका नानारूपा विनायका
गुरुसद्कृपा विनायका शिष्यवना हे विनायका ।

गं बीजाक्षर विनायका गं भीरास्था विनायका
ओंकाराक्षा विनायका वक्रतुंडा विनायका
सर्वादेश्री विनायका सच्चिदानंदा विनायका ।

———————————————

गणपति भजन स्तुती 4

आरंभीं वंदीन विघ्नविनायक । जया ब्रम्हादिक वंदितील ॥१॥
वंदितील संत कवि ऋषि मुनि । मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी ॥२॥
कार्यसिद्धी होय जयासी चिंतितां । त्याचें रुप आतां सांगईन ॥३॥
सांगईन रुप सर्वांगें सुंदर । विद्येचा विस्तार तेथुनीया ॥४॥
तेथुनिया विद्या सर्व प्रगटती । ते हे विद्यामूर्ति धरा मनीं ॥५॥
मनीं धरा देव भक्तांचा कैवारी । संकटीं निवारी आलीं विघ्नें ॥६॥
आलीं विघ्नें त्यांचा करितो संहार । नामें विघ्नहर म्हणोनियां ॥७॥
म्हणोनियां आधीं स्तवन करावें । मग प्रवर्तावें साधनासी ॥८॥
साधनाचें मूळ जेणें लाभे फळ । तोचि हा केवळ गजानन ॥९॥
गजाननें देह धरिले नराचें । मुख कुंजराचें शोभतसे ॥१०॥
शोभतसे चतुर्भुज त्रिनयनु । तीक्ष्ण दशनु भव्यरुप ॥११॥
भव्यरुप त्याचें पहातां प्रचंड । चर्चिलें उदंड सेंदुरेंसी ॥१२॥
शेंदुरें चर्चिला वरी दिव्यांबरें । नाना अलंकारें शोभतसे ॥१३॥
शोभतसे करीं फरश कमळ ।एके करीं गोळ मोदकाचे ॥१४॥
मोदकाचे गोळ एके करीं माळ । नागबंदी व्याळ शोभतसे ॥१५॥
शोभतसे तेज फांकलें सर्वांगीं । उभ्या दोहीं भागीं सिद्धिबुद्धि ॥१६॥
सिद्धिबुद्धि कांता ब्रम्हयाची सुता । सुंदरी तत्वतां दोघीजणी ॥१७॥
दोघीजणीमध्यें रुप मनोहर । नाना पुष्पेंहार चंपकाचे ॥१८॥
चंपकाचे हार रुळती अपार । ब्रीदांचा तोडर वांकीं पाईं ॥१९ ॥
वांकीं मुरडीवा तें अंदु नेपुरें । गर्जती गजरें झणत्कारें ॥२०॥
झणत्कारें घंटा किंकिणी वाजटा । कट तटीं धाटा पीतांबरु ॥२१॥
पीतांबर कांसे कांसीला सुंदर । वस्त्रें अलंकार दिव्यरुप ॥२२॥
दिव्यरुप महा शोभे सिंहासनीं । मूषकवहनी गणाधीश ॥२३॥
गणाधीश माझें कुळींचे दैवत । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२४॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान । आत्मनिवेदन रामदासीं ॥२५॥

———————————————————–

गणपति भजन स्तुती 5

लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्य रूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥
तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कापती तुझ्या नामें ॥४॥
चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रुणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनि भुलले मन माझें ॥६॥
भक्तवत्सला ऐकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसे ॥७॥
नामा म्हणे आता देई मज स्फूर्तिं । कर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥

———– ———— ———— ————- 

गणपति भजन स्तुती 6

शिवतनया विघ्नराया, लवकर ये धांवुनी । जय मोरया वेदगेया हांक माझी परिसुनी ॥ध्रु०॥
निर्गुण तूं निर्विकार अज अमर तारण । बहिरंतर्व्यापकत्‍वें सर्वांचा कारण ।
असुनि स्वयें तूंचि होसी धर्माचा धारण । सगुणपणें कोण जाणें तव महिमा या जनीं ॥१॥
श्रुति वदती तूं गणाचा गणपती म्हणुनिया । कविकविचा ज्येष्ठराज तूं अससी मोरया ।
ब्रह्माचा ब्रह्मणस्पति गणपति तूं करिं दया । निरवंद्या विश्ववंद्या ये आद्या धांउनी ॥२॥
संकटीं पार्वतीनें स्मरतां तूं सत्वर । येउनीयां स्वीय माया पसरुनियां आसुर ।
पळवुनियां पुत्र होसी तीचा लंबोदर । दरहर तूं विश्वहेतू ये धांवा परिसुनी ॥३॥

गणपति भजन स्तुती
Tagged on:     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!