Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

— श्रीमहागणपती स्थापना पूजा सामान लिस्ट —

( ही यादी डाउनलोड / शेअर करण्यासाठी खाली लिंक दिली आहे .. यादी तपासून जेव्हा पाहिजे तेव्हा डाउनलोड करावी .. जशी पाहिजे तशी एडिट करून आपल्याला पाठवावी .. )

हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध

समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी

अगरबत्ती , धूप  , कापुर

पळी भांडे – फुलपात्र

शंख , घंटी

पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर सर्व एकत्र )  ..

सुपाऱ्या 10 , लाल / पिवळे / हिरवे वस्त्र किंवा ब्लाउजपिस  पाटावर मूर्ती खाली

एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )

घरातील देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी

गंगाजल , गोमूत्र — सर्व घरात आधीच शिंपडने ..

विड्याची पाने 15

5 हळकुंड , 5 अक्रोड , 5 खारीक , 5 लवंग , 5 वेलची

11 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे  कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा

वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा  , गजरे व वेण्या 2 – 3 ,

बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे

हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल

हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी )  आणि जानवे जोड 3

चौरंग वैगेरे मखर सजावट सर्व तयार ठेवणे , गणपती ची मूर्ती आणून मखरामध्ये पाटावर किंवा चौरंगावर व्यवस्थित आधीच ठेवणे , मूर्तीखाली पाटावर किंवा चौरंगावर एक वस्त्र असावे..

देवासाठी —> एक पंचा किंवा  उपरणे किंवा एक नॅपकिन ( नवीन ) देवाच्या अंगावर

5 फळे , 3 नारळ , 2 खोबरेवाट्या , थोडा गूळ , थोडी खडीसाखर

2 तांब्या / पितळेचे कलश पाण्याने भरून ठेवणे , कलशामध्ये आंब्याची पाने किंवा डहाळी ,
2 ताम्हण

थोडे गहू / तांदूळ

दान म्हणून 21 किंवा 11 किंवा निदान 09 तरी धान्ये प्रत्येकी 125 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात   (  –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर ) ऐच्छिक , इच्छा  असल्यास , कंपल्सरी नाही…

घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ..
मखर सजावट वैगेरे सर्व तयार ठेवणे व त्यात चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र ठेवून मूर्ती ठेवणे .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळस दुर्वा बेल वैगेरे थोडेसेच निवडून ठेवावीत.
अपेक्षित माणसांचा प्रसाद मोदक वैगेरे तयार करून ठेवावे किंवा विकत आणावे ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल ..
काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा …
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा  )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..


महत्वाचे या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद … 

 

गणेश स्थापना यादी 

गणेश स्थापना यादी

Leave a Reply

Don`t copy text!