घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2018-03-30 15:03:23
हे नावाप्रमाणेच घोर म्हणजे चिंता , कष्ट यापासून सुटका करून देणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने सर्व दुःख - चिंता - विनाकारणचे अतिकष्ट कमी होऊन श्रीगुरुदत्त व स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होते.. ।। घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ।। श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान पाहि देवाधिदेव । भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।१।। त्वं नो माता, त्वं पिताप्तो धिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत, सदगुरुस्त्वम् । त्वं सर्वस्वं, नः प्रभो विश्र्वमूर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।२।। पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् । त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।३।। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता । कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।४।। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात्कष्टात उध्दरास्मान नमस्ते ।।५।। श्र्लोक पंचक मेतद्यो लोकमंगल वर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।। इति श्रीमद वासुदेवानंद सरस्वती कृतं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।। --- मराठी अर्थ --- हे देवाधिदेवा श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा, भावग्राह्या – क्लेशहारका सुकिर्ते, तुं सर्वदा आमचे रक्षण कर. आमचा या घोर कष्टातून उध्दार कर. तुला नमस्कार असो. ।।१।। हे अप्रभो (नाहि प्रभु ज्याला, तो अप्रभु म्हणजे सर्वप्रभु) सर्वप्रभो विश्र्वमुर्ते तू आमची माता, पिता, मालक, योगक्षेम चालविणारा सद्गुरु व सर्वस्व आहेस; म्हणुन आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।२।। हे ईश्वरा, तू आमचे पाप, ताप, शारीरिक व्याधी, मानसिक आधी, दारिद्य्र, भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर. हे पीडा नाशका, तुझ्यावाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही. याकरिता आमचा या घोर संकटातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।३।। हे देवा, आम्हास तुझ्याहून दुसरा त्राता नाही. दाता नाही. भर्ताही नाही. तू शरणागत-रक्षक व दु:खहर्ता आहेस. हे अत्रेया, आमच्यावर अनुग्रह कर. हे पुर्णकामा, घोर संकटापासून आमचा उद्दार कर. तुला नमस्कार असो. ।।४।। हे अखिलानंदकारकमुर्ते देवा, आम्हाला धर्माचे ठिकाणी प्रीती, भुक्ति, मुक्ति व भक्तिचे ठिकाणी आसक्ती दे. सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुझे चरणारविंदी आमचे शतश: प्रणाम असो. ।।५।। श्री सद्गुरुमहाराज म्हणतात, “सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकपंचक नियमपुर्वक नित्यश: भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य, श्रीदत्ताला अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्तही उत्तरोत्तर या भक्ताला प्रिय होईल”, असा माझा आशीर्वाद आहे ।।

Search

Search here.