http://wc8voa.org/wp-json/oembed/1.0/embed?url=http://wc8voa.org/hamvention-volunteers/ बावन्नश्लोकी गुरुचरित्र

एखाद्याला गुरुचरित्र पारायण करणेची इच्छा असेल पण वेळे अभावी जमत नसेल त्याने हे गुरुचरित्र सार अनेक वेळा पठन करावे .. सद्गुरु भक्तानी / दत्त भक्तानी तर नियमित पणे या स्तोत्राचे पठन – श्रवण करावे म्हणजे सद्गुरुंची कृपा / दत्तकृपा प्राप्त होते .. या स्तोत्राच्या पठनाने / श्रवनाने अनेक प्रकारचे त्रिविध ताप / अरिष्ट निवारण होऊन  श्रीसद्गुरुंचा आशीर्वादाने   सर्व सौख्य समृद्धि प्राप्त होते.  अर्थात सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा , शुचिर्भूतता , पवित्र अंतःकरण , व आपल्या कर्मात प्रयत्न – विश्वास हे सुद्धा हवे .. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण खरी करण्यासाठी सुद्धा त्या ताकदीची उपासना भक्ति असायला हवी .. जय श्री गुरुदेवदत्त  

॥ ऊँ श्रीगणेशाय नमः॥

॥ ऊँ श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः॥

अथ ध्यानम् —

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।

पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।

चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।

द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा ।

गजानना गिरिजाकुमरा ।

जयजयाजी लंबोदरा ।

एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥

त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा ।

कृष्णातिरी वास करुनी ओजा ।

सद्भक्त तेथे करिती आनंदा ।

त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥

जयजयाजी सिद्धमुनी ।

तूं तारक भवार्णावांतुनी ।

संदेह होता माझे मनी ।

आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥

ऐशी शिष्याची विनंती ।

ऐकुनि सिद्ध काय बोलती ।

साधु साधु तुझी भक्ति ।

प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥

भक्तजनरक्षणार्थ ।

अवतरला श्रीगुरुनाथ ।

सागरपुत्रांकारणें भगीरथें ।

गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥

तीर्थे असली अपार परी ।

समस्त सांडुनि प्रीति करी ।

कैसा पावला श्रीदत्ताची ।

श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥

ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति ।

तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ।

वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती ।

कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥

गोकर्णक्षेत्री श्रीपादयती ।

राहिले तीन वर्षे गुप्ती ।

तेथूनी गुरु गीरीपुरा येती ।

लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥

श्रीपाद कुरवपुरी असतां ।

पुढें वर्तली कैसी कथा ।

विस्तारुनी सांग आतां ।

कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी ।

श्रीगुरु महिमा काय पुससी ।

अनंतरुपे परियेसी ।

विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा ।

अवतार झाला श्रीपादहर्षा ।

पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा ।

कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥

श्रीगुरु म्हणती जननीसी ।

आम्हा ऐसा निरोप देसी ।

अनित्य शरीर तूं जाणसी ।

काय भरवंसा जिविताचा ॥ १२ ॥

श्रीगुरुचरित्र कथामृत ।

सेवितां वांच्छा अधिक होत ।

शमन करणार समर्थ ।

तूचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥

ऐकुनि शिष्याचे वचन ।

संतोष करी सिद्ध आपण ।

श्रीगुरु चरित्र कामधेनू जाण ।

सांगता झाला विस्तारे ॥ १४ ॥

ऐक शिष्या शिरोमणी ।

धन्य धन्य तुझी वाणी ।

तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।

लीन झाली परियेसी ॥ १५ ॥

विनवी शिष्य नामांकित ।

सिद्ध योगियातें पुसत ।

सांगा स्वामी वृत्तांत ।

श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥

ऐक शिष्या नामकरणी ।

श्रीगुरुभक्त शिखामणी ।

तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।

लीन झाली निर्धारे ॥ १७ ॥

ध्यान लागले श्रीगुरुचरणी ।

तृप्ति नोव्हें अंतःकरणी ।

कथामृत संजिवनी ।

आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥

अज्ञान तिमिर रजनीत ।

निजलो होतो मदोन्मत्त ।

श्रीगुरुचरित्र वचनामृत ।

प्राशन केले दातारा ॥ १९ ॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी ।

श्रीगुरु आले गाणगापुरासी ।

गौप्यरुपें अमरपुरासी ।

औदुंबरी असती जाण ॥ २० ॥

सिद्ध म्हणे नामधारका ।

ब्रह्मचारी कारणिका ।

उपदेशी ज्ञान विवेका ।

तये प्रेत जननीसी ॥ २१ ॥

तुझा चरणसंपर्क होता ।

झाले ज्ञान मज आतां ।

परमार्थी मन ऐकता ।

झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥

लोटांगणे श्रीगुरुसी ।

जाऊनि राजा भक्तिसी ।

नमस्कारी विनयेसी ।

एकभावें करुनियां ॥ २३ ॥

शिष्यवचन परिसुनी ।

सांगता झाला सिद्धमुनी ।

ऐक भक्ता नामकरणी ।

श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा ।

श्रीगुरुची अगम्य लीला ।

सांगता न सरे बहुकाळा ।

बावन्नश्लोकी गुरुचरित्र

One thought on “बावन्नश्लोकी गुरुचरित्र

  • September 12, 2017 at 1:21 am
    Permalink

    Very nice and I proud of you really great job lot of thanks

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *