आरती गुरुदत्ता अवधुता

आरती  > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-03-28 06:48:24
श्री दत्तात्रेयांची आरती / सद्गुरू आरती आरती गुरुदत्ता अवधुता , नरहरी भाग्य विधाता ।। ध्रु ॥ मुढ जरी झालो, भगवंता, चरणी ठेवुनी माथा ॥1॥ आरती गुरुदत्ता ... विसरुनि तव पाया, अनुसुता ज्ञान उदेले आता ॥2 ॥ आरती गुरुदत्ता ... लिन तुझे ठायी, गुरुनाथा , तुचि आम्हां उध्दरता ॥ 3॥ आरती गुरुदत्ता ... तुजविन मज कोणी नचत्राता , भक्त वत्सला ताता ॥ 4 ॥ आरती गुरुदत्ता ... नित्य तुझी सेवा मज होता , अनुभविलि तव ममता ॥ 5 ॥ आरती गुरुदत्ता ... नरहरी गुरुदत्ता श्रीमंता , आरती घेई आता ॥ 6॥ आरती गुरुदत्ता ...

Search

Search here.