लग्न गीते

सण व उत्सव Posted at 2016-04-13 13:36:24

 

 

 

हळद

1. घाणा जी घातिला खंडीभर भाताचा घाणा जी घातिला खंडीभर भाताचा मांडव गोताचा दणका भारी घाणा जी घातिला खंडीभर भाताचा आधी मान देती कुंकवाला आधी मान देती हळदीला 2. घाणा भरीला । सवाखंडी सुपारी मांडवी व्यापारी । गणराज घाणा भरीला । सवा खंडी गहू नवर्या मुलीला गोत बहू । गणराज घाणा भरीला । सवा खंडी भाताचा नवरा मुलगा गोताचा । गणराज मांडवाच्या दारी । उभा गणपती नवर्या मुलाला गोत किती । गणराया मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण नवर्या मुलाला केळवण । गणरायाला मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी मूळ ग वर्हाडी । आंबाबाई मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो चहूकडे चित्त देतो । गणराज मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा लोडाला जागा ठेवा । माणसांच्या घाणा भरीला । सवा खंडी कणिक मांडवी माणीक । आंबाबाई 3. भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो पाटाच पाणी सारंगी जातो हळदीचा लोट पारवा पितो..... 4. हळद (लग्ना नंतर) नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी लेकीच्या करता जावयाची गोडी माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी जावयाचा मान एवढा केला कशासाठी लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको लक्ष्मीबाई आली मागच्या दारान कडा उघडावी धाकटया दिरान लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात पहिला दिवस पुसाव चांगला हिरव्या चोळीवर काढला बंगला दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय ऐकते शांतीपाठ हरखून माय आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा नवव्या दिवशी शेजेला फुल दाट गोर्या राधिकेन केला हा थाटमाट दहाव्या दिवशी वाजती चौघडे बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला समया कारण भाऊ आला भेटायला बहीण भावंड आहेत समस्तला बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ नको भावा म्हणू बहिणींनी नासल बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर 5. आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया वासरासहित पाची गाया आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया ऊसा सहित पानमळा आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया बहिण परिस लेकीची माया आंदण देई रे भाऊराया 1. विहीणबाईची करणी बघा मग बंधूला लेक मागा विहीण मागते थोड थोड नवर्या बाळाला कंठी तोड त्या ग कंठीच सोन फिक्क बंधु कंगण्या जोग रुप त्या ग कंगण्या पडल्या काळ्या बंधु आणा हो वेलबाळ्या वेलबाळ्याला बाजूबंद चोळी पातळ मला दंड त्या ग पातळाची निरी निरी रुतते माझे पोटी बंधू आणा हो लाल लाल दाटी लाल लाल दाटीचा पिवळा सर बंधु लावा वो वर भिंग 2. अहो अहो विहीणबाई आमचे मागणे काही नाही आमचे मागणे थोडे थोडे नवर्या मुलीला पैंजणतोडे पैंजण जोडव्यांची हौस फार नवर्या मुलीला चद्रहार चंद्रहाराची हौस मोठी नवर्या मुलीला चिंचपेटी चिंचपेटीला मोती थोडे नवर्या मुलीला हत्तीघोडे हत्तीघोडयावर बसती गावाकडे दोघे जाती आई पाहते खिडकीतून बाप पाहतो दारातून भाऊ पहातो ओटयावरुन हरणी गेली कडल्यातून ज्याची होती त्यान नेली आमची माया वाया गेली 3. विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा गोरी गोरी वरमाय तिचे नाजुक पिवळे पाय गव्हा तांदळान भरल्या कोठया खोबर्या नारळान मी भरीते ओटया खणा नारळान मी भरीते ओटया विहीणबाई राग मनातला सोडा जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन दात कोरते लवंगान घंगाळी रुपये तुम्ही घाला विहीणबाई राग मनातला सोडा रेशमी पायघडयावरुन मिरवा विहीणबाई राग मनातला सोडा मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला कंठी गोफासाठी जानोसी बसला नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा

Search

Search here.