पैंजणाचा नाद आला गोड

भजन - स्तुती Posted at 2018-10-12 01:49:05

पैंजणाचा नाद आला गोड

पैंंजणाचा नाद आला गोड कानी गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेवुनी । वैभवाचा सारे साज गळा लेवुनी । कोल्हापुरची महालक्ष्मी दारी आली गं , उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। हिरवा रंग अती खुलवी खुलवी सुंदर । हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदुर । जय भवानी तुळजापुरची दारी आली गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पाही वळुनी दारातुनी माय माऊली । भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी । सप्तश्रृंगी देवी आली आता बाई गं । उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। रुप तिचे लावण्याचे रंग तांबुल । माहुराश्री रेणुका हि शालु ही लाल । लेकिला ही बघण्या आली दारी माझ्या गं , उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आले गं ।। माय माऊली कुलस्वामिनी माझी आली गं , पाऊल दिसता लोटांगण दासी घाली गं । कुलस्वामिनी मोहिनी राज दारी आली गं , उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।

Search

Search here.