पंचायतन आरती

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-10-17 04:37:40
पंचायतन आरती जयदेव जयदेव जय पंचायतना ॥ हरि हर भगवती गणपति चिन्मणि चिद्रत्ना ॥ध्रु०॥ क्षिरनिधिजापति शेषशयना गोविंदा ॥ नित्य निरामय सच्चित्सुखरूप निर्द्वंद्वा ॥ बाळ मुकुंदा परमानंदा सुखकंदा ॥ आरति तुझिया चरणारविंदा ॥१॥ कर्पूरगौरा गिरिजारमणा महादेवा ॥ हर मृड शिव शंकर स्वामी नीलग्रीवा ॥ वेदश्रुति वदती तुज एकमेवा ॥ आरति करिता घडली तव सेवा ॥२॥ चिच्छक्ती चिन्मात्रें तूं मूळ माते ॥ अनघ निजमुखसरिते स्वानंदभरिते ॥ करविरपुरवासिनि तूं कुळादैवते ॥ आरति केली तुजला चित्सत्ते ॥३॥ मंगळमूर्ति गजानन प्रारंभीं स्तवितां ॥ सकलहि विघ्नें नासुनि हरिली तनु ममता ॥ म्हणवुनि भावें नमिलें तुज एकदंता ॥ आरति करितां झाली समसाम्यें समता ॥४॥ विश्वप्रकाशक अंबरमणि निजतेजाचा ॥ चिद्नगनीं तो उदयो होतां तम कैंचा ॥ परा पारुषली कुंठित हे वाचा ॥ अभंय निज रंगें हा रंगविला साचा ॥५॥

Search

Search here.