रामनवमी हनुमान जयंती उपाय

उपाय - तोडगे Posted at 2016-04-15 12:51:29
हरि ऊँ  जय श्रीराम जीवनात अत्यंत त्रास असल्यास तो त्रास कमी करण्यासाठी , महत्वाचे अडकलेले काम पूर्णत्वास जाण्यासाठी , सतत अपयश व दुर्दैव -  अडथळे येत असल्यास , प्रकृती ची सतत काही ना काही तक्रार असल्यास तसेच अपघटना गंडांतर याचा असल्यास , मुलांची भीती कमी व्हावी आणि त्यांना उत्तम विद्याभ्यास प्राप्त व्हावा -- हे सर्व त्रास कमी करण्यासाठी , सर्व समृद्धता सफलता सुयश प्राप्ती साठी आज पासून ते हनुमान जयंती पर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी ( संध्याकाळी उत्तम ) खालील पैकी उपासना करू शकतात . श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे .. 1-- भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी 15 वेळा म्हणणे .. सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे .. 2-- रोज 16 किंवा 21 वेळा रामरक्षा म्हणणे 3 -- देवीचे कोणतेही स्तोत्र ( देवी कवच / श्री सूक्त / देवी स्तोत्र ) रोज 16 किंवा 21 वेळा म्हणणे 4 -- रोज दुर्गा सप्तशती पाठ म्हणणे किंवा गुरुजींकडून म्हणून घेणे .. 5 -- हनुमान वडवानल स्तोत्र रोज 11 वेळा म्हणणे ( कोर्ट कचेरी मध्ये यश मिळणे साठी ) वरील उपायांनी मनःशांती प्राप्त होऊन अनेक प्रकारचे लाभ होतील . त्रास कमी होईल , इच्छित साध्य होईल , हनुमंताची कृपा प्राप्त होईल .. वरील उपासना संध्याकाळी करावी . सकाळी तसेच संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हंटले तर उत्तमच. संध्याकाळी नाही जमले तर रात्री म्हणावे .. जमल्यास राम मंदिर किंवा हनुमान मंदिरामध्ये केल्यास अत्यंत उत्तम फल प्राप्ती .. हनुमान जयंतिला जमल्यास गुरुजींना बोलावून यथासांग अभिषेक - पूजन - नेवैद्य आदी करून शिधा आदी दान देऊन सांगता करावी . किंवा निदान मंदिरात जाऊन धान्य फळ प्रसाद अर्पण करावा .. गरिबांना दान द्यावे .. वर सांगितलेले अनेक स्तोत्र आपल्या वेबसाईट वर मंत्र स्तोत्र आरती या विभागात आहेत .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा महाबली श्री हनुमंत व श्री राम आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत . जय श्रीराम

Search

Search here.