रेणुका माता आरती

आरती  > देवी आरती Posted at 2018-11-17 04:25:46
रेणुका मातेची आरती जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥ मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती । वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती ॥१॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥ भाग्यवती तूं जननी, परशुरामाची । तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची ॥२॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥ सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी । तुझीच नाना नावें नाना अवतारी ॥३॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥ जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला । मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला ॥४॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥

Search

Search here.