ग्रहणातील नियम

व्रत - पूजा - कथा Posted at 2017-02-12 09:07:36

ग्रहणातील नियम

खालील नियम हे दोन्ही ( चंद्रग्रहण सूर्यग्रहण ) ग्रहणासाठीचे आहेत.. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामधे देवपूजा, तर्पण, श्राध्द, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामधे) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुध्दी असते. ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच पाण्यात व इतर पदार्थांवर  दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत. पाण्यात गंगाजल गोमूत्र टाकावे ..    ग्रहणात स्नान करुन पुजा , मंत्र - स्तोत्र - जप - नामस्मरण करावे.. स्वतःला म्हणता येत नसेल तर निदान श्रवण करावे ( ऑडिओ ऐकावे )   ग्रहण काळात झोपू नये , अशक्त / आजारी / गर्भवती आदींनी सुद्धा भले टेकून बसावे पूर्ण झोपण्याची टाळावे..    गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी. मन्त्र जप - नामस्मरण - स्तोत्र पठण किंवा निदान श्रवण करावे . घरातून बाहेर जाऊ नये. व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.    ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका. शांत आंनदी रहावे , ध्यान करावे नामस्मरण करावे , अति बडबड वैगेरे करू नये , मौन राहिल्यास सर्वोत्तम ..   ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये ,  ग्रहणकाळात शौचास जाऊ नये .. ( मलमूत्रत्याग करू नये ) ग्रहणकाळात शरीर समागम - संभोग करु नये . ब्रह्मचर्य पालन करावे..    ग्रहणकाळात व्यसन , भांडण - वादविवाद , चोरी , फसवणे इत्यादी करु नये.. तसे तर आयुष्यात कधीही हे करू नयेच्..    ग्रहणकाळात जीवजंतू व पशु पक्षी प्राणी वैगेरे हत्या करु नका. हे सुद्धा नुसते ग्रहण कालच नाही तर आयुष्यात कधीही करू नये..   ग्रहणकाळात स्वयंपाक - भोजन करु नये. धुने - भांडी धुणे , अडगळ काढणे - झाडपुस करणे , घराची स्वछता करणे आदि कामे नये. पाणी भरु नये.. इतर वेळी मात्र हे  नियमित करावे .. ग्रहणाच्या दिवशी सण उत्सव व्रत आले असता वेधकाला आधी साजरे करावे .. पूजन वैगेरे हे केव्हाही करता येईल परंतु महाप्रसाद - भंडारा भोजन इत्यादी हे मात्र वेधकाला पूर्वीच करावे.. आणि जर ग्रहणाआधी असे करता येत नसेल तर मात्र विद्वत जाणकार व्यक्तीला विचारून शास्त्रसंमत जे योग्य असेल ते करावे.. ग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल गोमूत्र टाकून स्नान करावे , घरात गंगाजल गोमूत्र शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. शक्य असल्यास देवदर्शन - दानधर्म  करावे .. सर्वात मुख्य म्हणजे घाबरू नये - शंका कुशंका करू नये .. चुकीची माहिती पसरवू नये.. एखाद्या माहितगार व्यक्तीकडून नीट माहिती घ्यावी.. आपले हे शास्त्र संपूर्णपणे विज्ञानावर आधारित असून ऋषीमुनींनी संपूर्ण समाजाचा विचार करून सर्वांचा उत्कर्ष व्हावा यासाठीच अनुभवनिष्ठ असे नियम बनवले आहेत .. जर एखाद्याला काही पाळायचे नसेल तर त्याने पाळू नये परंतु जो हे नियम पाळत असेल त्याला विरोध तरी करू नये.. ज्याची त्याची इच्छा तसेच ज्याचे त्याचे कर्म.. आपण स्वतः चांगले करत नाहीत तर निदान दुसरा करत असेल तर त्याला आडकाठी करू नये - किंवा अपप्रचार करू नये.. आपलाच धर्मसेवक -- श्री श्याम जोशी गुरुजी , टिटवाळा ..    याबाबत अजून काही विशिष्ट माहिती कोणाकडे असेल तर ती इमेल द्वारे द्यावी म्हणजे यात समाविष्ट करता येईल ..

Search

Search here.