सत्यनारायण आरती 2

आरती  > विष्णु आरती Posted at 2018-03-29 12:12:40

|| आरती सत्यनारायणाची ||

काशी क्षेत्री प्रकटुन देसी द्विराजा ||
वाजी हस्ती आणिक रथ धन सूत जाया ||
प्रल्हादापरी त्यावरी केलि बहु माया ||
अंति दिल्ही त्यासी घननिळ निजकाया ||
जय देव जय देव जय सत्येश्वर देवा ||
कलियुगि तत्क्षणि पावून घेसी निजसेवा ||1 ||

नलगे ज्योतिषशुद्धि शास्त्रादिक शुद्धि ||
व्हावी एकच बुद्धि त्यादिन मनिं वृद्धि ||
इच्छित जें तें देसी मनुजा फलसिद्धि ||
तेतिस कोटिमध्यें यायुगि त्वत्सिद्धि ||
जय देव जय देव जय सत्येश्वर देवा ||
कलियुगि तत्क्षणि पावून घेसी निजसेवा ||2 ||

साधुनामक वाणी बोले निजराणी ||
देवा व्हावी मजला संततिची खाणी ||
पूजिन नंतर मी तो हरि हर्षानीं ||
ऐसे मानसि नित्य मित सोडी तों पाणी ||
जय देव जय देव जय सत्येश्वर देवा ||
कलियुगि तत्क्षणि पावून घेसी निजसेवा ||3 ||

ऐसा तोहि साधु घेऊनि मनकामा ||
शेवटी गेला देवा रविकोटीधामा ||
थकला तोहि शेष वर्णविना महिमा ||
तेथे थकती जिव्हा घेता तव नामा ||
जय देव जय देव जय सत्येश्वर देवा ||
कलियुगि तत्क्षणि पावून घेसी निजसेवा ||4 ||

अमृत कृष्णा मतिनें केली ही आर्ती ||
मजला नाहीं बुद्धी स्तवनाची स्फूर्ती ||
हृदयी बैसो देवा कोमल ती मूर्ती ||
दीनोद्धारा देवा त्रिभुवनि त्वत्कीर्ति ||
जय देव जय देव जय सत्येश्वर देवा ||
कलियुगि तत्क्षणि पावून घेसी निजसेवा ||5 ||

Search

Search here.