सत्यांंबा आरती

आरती  > देवी आरती Posted at 2018-10-17 05:57:17
सत्याअंबा आरती  जयदेवी जयदेवी जय श्रीसत्याम्बे । अनाथनाथे अम्बे आई जगदम्बे ॥धृ॥ संकटी पडता कार्तिकस्वामी रणकाळी ॥ सत्याम्बा व्रत करण्या सांगे शशिमौळी ॥ व्रत करिता जय लाभे प्रसन्न हो काली ॥ अम्बे तव महिमा गाऊ त्रिकाळी ॥१॥  जयदेवी ॥ होता कांचिपुरी ब्राह्मण कौंडिण्य ॥ विटला बहु जीवाला न मिळे त्या अन्न ॥ व्रत करिता सत्याम्बा होई प्रसन्न ॥ देऊनि सुखसंपत्ती त्या केले धन्य ॥२॥ जय देवी ॥ सूर्यकेतू राजा सौराष्‍ट्राधिप थोर ॥ परचक्रा योगे त्या लागे घोर ॥ व्रत करिता सत्याम्बा करी चमत्कार ॥ पळमात्रे शत्रूचा होई संहार ॥३॥ जयदेवी ॥ गुण्ड नामे शूद्र होता मालवदेशी ॥ पूर्वपापायोगे सुत नव्हता त्यासी ॥ व्रतमहिमा ऐकोनि करिता व्रतासी ॥ झाला सुपुत्र तत्कुल उध्‍दरिता त्यासी ॥४॥ जयदेवी ॥ ऐसा तव व्रतमहिमा माते अपार ॥ व्रत करिता करिशी भक्‍ता भवपार ॥ तुझ्या भक्‍तीमध्ये न पडो अंतर ॥ अंबे तव कृपेचे हेचि एक सार ॥५॥ जयदेवी ॥

Search

Search here.