श्री सत्यनारायण छोटी आरती

आरती  > विष्णु आरती Posted at 2018-11-25 10:40:25
 श्री सत्यनारायण छोटी आरती जय देव जय देव श्रीसत्यनारायणदेवा ओवाळुनी आरती करतो तव सेवा ॥ जय देव जय देव .... पूजा करता भावे सुरस कथा ऐकोनीया हरती भक्तांच्या चिंता प्रसाद भक्षण करुनी करता तव धावा प्रसन्न होऊनी पुरवी इच्छित तू देवा ... जय देव जय देव श्रीसत्यनारायणदेवा ओवाळुनी आरती करतो तव सेवा  ॥1॥ अनन्य भावे पूजुनी हे व्रत जे आचरती भवभय वारूनी त्यांचे देसी सुखशांती लाभ कृपेचा देवा भक्तजना व्हावा संतति संपत्ती देऊनि ठाव पदी द्यावा .... जय देव जय देव श्रीसत्यनारायणदेवा ओवाळुनी आरती करतो तव सेवा  ॥ 2 ॥ न वर्णवेना महिमा ब्रम्हादिक देवा नेणति श्रमले चारी तुज कैसा ध्यावा स्वरुप तुझे सत्यं शिवं सुंदर देवा अल्पशी स्वानंदाची स्वीकारी सेवा .... जय देव जय देव श्रीसत्यनारायणदेवा ओवाळुनी आरती करतो तव सेवा  ॥3॥

Search

Search here.