आरती पार्वतीरमणा

आरती  > देवी आरती Posted at 2018-03-29 14:52:34
जय जय आरती पार्वतीरमणा भवभयनाशना दुष्ट निकंदना ।। ध्रु॰ ।। पंचवदन दशभुज विराजे जटाजूटी गंगा सुंदर साजे ।। १ ।। जय... कंठी रुंडमाळा हस्तिंकपाल वाहन नंदी शोभे भूषण व्याल ।। २ ।। जय... गजचर्मांबर तव परिधान त्रिशूलधारण भस्मविलेपन ।। ३ ।। जय... दिगंबररुपा शिवमहारुद्रा वासुदेव प्रार्थी ज्ञानसमुद्रा ।। ४ ।। जय...

Search

Search here.