Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शंकराची आरती / भजन / स्तुती  1

जय जय आरती , पार्वती रमणा ॥
भवभय नाशना  दुष्टनिकंदना ॥ धृ. ॥
पंचवदन दश भुज विराजे ॥
जटाजुटी गंगा , सुंदर साजे ॥ १ ॥
कंठी रुंडमाळा , हस्तिकपाल ।
वाहन नंदी शोभे , भूषण व्याल ॥ २ ॥
गजचर्मांबर , तव परिधान ॥
त्रिशुलधारण , भस्मलेपन ॥ ३ ॥
दिगंबररूपा , शिव महारुद्रा ॥
वासुदेव प्रार्थी , ज्ञानसमुद्रा ॥ ४ ॥

———————————————-  

शंकराची आरती / भजन / स्तुती  2

कर्पूर गिरिसम कांतिदशकर शोभे शिरी गंगा ।
जवळी गणपति नृत्य करितो मांडुनिया रंगा ॥

अंकी अंबा सन्मुख नंदी सेविती ऋषी संगा ।
ब्रह्मादिक मूनि पूजा इच्छिती ध्याति अग्यंगा ॥

सुंदरपण किती वर्णूं रति – पति मदनाची मूर्ति ।
तेज पहातां संतृप्त होती कोटी गभस्ती ॥

वेदां नकळे पार जयाचा तो हा सुखमूर्ति ।
भक्तकाजकल्पद्रूम प्रगटे पाहूनियां भक्ति ॥

अंधक ध्वसुनी मख विध्वंसुनी बलहत करी दक्षा ।
त्रिपुरा सुरशल मर्दूनि सुखकर खला करी शिक्षा ॥

तो तू अगुणी सगुण होसी भक्तांच्या पक्षा ।
धर्म स्थापुनि साधु रक्षिसी सूरांकृति दक्षा ॥

नारद तुंबर व्यास सुखादिक गाती सद् ‌ भावे ।
सनक सनंदन वशिष्ट वाल्मिक याना यश द्यावें ॥

चिन्मय रंगा भवभयभंगा हरि प्रिया धांवें ।
तवपद किंकर रामदास हा यासी नुपेक्षावे ॥

जर आरती म्हणुन वापरल्यास हे धृवपद वापरावे.
( जय जय देवा आरती हरि हरेश्वरा । दयाळा ॥
काया वाचा मनोभावे नमू परात्परा ॥ धृ . ॥  )

———————————————-  

शंकराची आरती / भजन / स्तुती  3 

नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥१॥
शिरीं जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥२॥
अंगां लावूनियां राख । मुखीं राम नाम जप ॥३॥
भक्तां प्रसन्न नाना परी । अभयंकर ठेऊनि शिरीं ॥४॥
दास ह्मणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ॥५॥
——- —— ——– ——– ——— ——— —-  

शंकराची आरती / भजन / स्तुती  4

कराळें विक्राळें भुतें नानापरी । तेथें क्रीडा करी महादेव ॥१॥ अमंगळ सीळा तो नये कंटाळा । डोलतसे भोळा चक्रवर्ती ॥२॥ भुतें मांस खाती रक्त तोंडीं हातीं । वर्डाती झोंबती एकमेकां ॥३॥ कैंचे भारेभार चालिले अपार । फुंपाती विखार आंगावरी ॥४॥ लवथविती ओलीं हत्तीचीं कातडीं । गळती अंतडीं लवथवीत ॥५॥ साजुक सीसाळें टोंचुनी दोरीसी । रुंडमाळ ऐसी हेलावते ॥६॥ वन्हीनें पोळला विषें जाजावला । घामें थबथबीला सावकाश ॥७॥ घामावरी रक्त रक्तावरि राख । राखेवरी विख वाहतसे ॥८॥ भूतफौजा ऐशा भणभणती माशा । नंदीच्या गोमाशा भारेंभार ॥९॥ बेल राख आणि धोतर्‍याचीं फुलें । पुजेलागीं मुलें धांवताती ॥१०॥ सिद्धीची उपेक्षा भयानक दीक्षा । अभक्तांसि शिक्षा लावितसे ॥११॥ दास म्हणें हर तो भोळा शंकर । भक्तांसी अभर करीतसे ॥१२॥

——– ——– ——- ——– ——— ——— ——-  

शंकराची आरती / भजन / स्तुती  5 

माझा कुळस्वामी कैलासींचा राजा । भक्तांचिया काजा पावतसे ॥१॥ पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ॥२॥ कैवारी देव व्याघ्राच्या स्वरुपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥ जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतरांची ॥४॥ इतरांची शक्ति शंकराखालती । वांचविली क्षिती दास ह्मणे ॥५॥

—— ——– ——— ——— ——— ———– —– 

शंकराची आरती / भजन / स्तुती  6

सोरटींचा देव माणदेशा आला । भक्तीसी पावला सावकाश ॥१॥ सावकाश जाती देवाचे यात्रेसी । होति पुण्यराशी भक्तिभावें ॥२॥ भक्तिभावें देव संतुष्ट करावा । संसारीं तरावा दास म्हणे ॥३॥ ६५ पृथ्वी अवघी लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ॥१॥ आतां कोठें ठेवूं पाव । जेथें तेथें महादेव ॥२॥ अवघा रुद्रचि व्यापिला । ऐसें देवचि बोलिला ॥३॥ दासें जाणोनियां भला । देह देवार्पण केला ॥४॥

शंकर भजन स्तुती
Tagged on:         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!