राधारमणा तूच हरी

आरती  > विष्णु आरती Posted at 2018-03-29 15:07:43
श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी आरती करितो बहु प्रेमाने, भवभयसंकट दूर करी ।। ध्रु॰ ।। दानव दमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी भक्तकाज कल्पद्रुम ह्मणुनि निशिदिनीं ध्याती भक्त तुशी अतिविषधर जो काळा फणीवर कालिया यमुना जलवासी तत्फणिवर तू नृत्य करुनी पोचविले त्या मुक्तीशी ।। श्यामल... कैटभ चाणूर कंसादिक हे शौर्ये वधिले अमित अरी नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ।। श्यामल...

Search

Search here.