Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

जय देव , जय देव , जय श्री स्वामी समर्था , जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।

छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी , राया अवतरलासी ।
जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी ।
भक्तवत्सल खरा तु एक होसी ,
राया एक होसी।
म्हणुनी शरण आलो तव चरणासी ।
जय देव, जय देव० ॥१॥

त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार , तुझा अवतार ।
त्याची काय वर्णु लिला पामर ।
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार ,
नलगे त्या पार ।
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार ।
जय देव, जय देव० ॥२॥

देवाधिदेवा तु स्वामी राया ,
तु स्वामी राया ।
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया ।
तुझसी अर्पण केली आपुली ही काया ,
आपुली ही काया ।
शरणागता तारी तु स्वामी राया ।
जय देव, जय देव० ॥३॥

अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले ,
जडमुढ उध्दारिले ।
किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे ।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले ,
मज हे अनुभवले ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे ।
जय देव, जय देव० ॥४॥

श्री स्वामी समर्थ आरती1
Don`t copy text!
%d bloggers like this: