श्री विष्णू आरती

आरती  > विष्णु आरती Posted at 2018-03-29 15:21:46
अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा निजपद देउनी हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। १ ।। जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती ।। ध्रु ।। पयसागर जाकांता धरणीधर शयना करुणालय वारिसी भव वरिज दल नयना गरुडध्वज भजनप्रिय पीत प्रभवसना अनुदिनी तव कीर्तनरस चाखो हे रसना ।। २ ।। जयदेव... नंदिवहना गहना पार्वतीच्या रमणा मन्मथदहना शंभो वातात्मज नयना सर्वोपाय विवर्जित तापत्रय शमना कैलासाचल वासा करिती सुरनमना ।। ३ ।। जयदेव... पद्म बोधकरणा नेत्रभ्रम हरणा बोधनबंधन हर्ता द्योतक आचरणा किरणस्पर्शे वारिसी या तम आवरणा शरणागत भयनाशन सुखवर्धन करणा ।। ४ ।। जयदेव... त्रिभुवनउत्पती पालन करिसी तू माया नाही तुझिया रूपा दुसरी उपमा या तुझे गुणगण महिमा न कळे निगमा या करुणा करिसी अंबे मनविश्रामाया ।। ५ ।। जयदेव...

Search

Search here.