Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

देवी भजन स्तुती

|| जय जय रेणुके || ( चाल – लो लो लागला )

जय जय रेणुके | श्रीमाते | माहुरगडी वसते | भक्ता देईतु | मुक्ति हो | मूळपीठ नायिके || धृ. || उंच बसलीस | डोंगरी अरण्या भीतरी | हिंस्र पशूंच्यां | हो राणी | पावे मज निर्वाणी || धृ.१ || डोंगर पायथी | तलाव.. | मातृका नामे थोर | जन येती हो | स्नानांसी | पावती मनोरथासी | ऐसी तव लीला | अहो बाई | दर्शन दे ग आई || धृ.२|| दत्त नामे हो शिखर | अनुसया डोंगर | भद्रकाली ती समोर | नांदे परशुराम | भक्ता करितसे | पावन | लागो तुझे ध्यान || धृ.३ || तीर्थे असती | एकशे आठ | सर्वहि बहुश्रेष्ठ | सर्वहि तीर्थेहो | पवित्र | मना आनंद देत | तेथे पाहूनिया | ती शोभा हरी तन्मय उभा || धृ.४ ||

—— ——- ——— ——- ——– ——-

|| आली भावनीभक्तासाठी ||
आली भवानी भक्तासाठी | दरबारी धावत || २ ||
पायी घागऱ्या रुणुझुणुवाजती | आनंदे डोलत || धृ ||
अष्टभुजा नारायणी | लाल शालू हा नेसोनी
सिंहावरी स्वार होऊनी | झणझणकार करीत || १ ||
किरीट कुंडल कुरळे केस | भाळी मळवट बिंदी घोस |
मुखी तांबूल रंगला खास | विकट हास्य जोरात || २ ||
शक्ती चक्र गदा घेऊनी | खङग परीघ हाती असोनी |
वरद हस्ते उभी भवानी | शंख वाजवी जोरात || ३ ||
सर्व भक्ता दर्शन देऊनी | संकटे त्यांचीे सर्व हरोनी |
दशदिशा अवलोकुनी | हरी शरण अंबेसी || ४ ||

—— ——– ———- ———

सदा आनंदभरित । रंग साहित्य संगीत ॥१॥

जगन्माता जगदीश्वरी । जगज्योति जगदोद्धारी ॥२॥

जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रम्हादिक ॥३॥

बहु राजे राजेश्वर । सर्व तुझेचि किंकर ॥४॥

वसे आकाशीं पाताळीं । सर्वकाळीं तिन्हीताळीं ॥५॥

सर्व देह हालविते । चालविते बोलविते ॥६॥

मूळमाया विस्तारली । सिद्धसाधकांची बोली ॥७॥

शक्ति सर्वांगें व्यापिली । शक्ति गेली काया मेली ॥८॥

होते कोठून उत्पात्ति । भगवती भगवति ॥९॥

सुख तीवांचूनि नाहीं । नलगे अनुमान कांहीं ॥१०॥

जाली माता मायराणी । भोग नाहीं तीवांचूनी ॥११॥

भूमंडळींच्या वनिता । बाळ तारुण्य समस्तां ॥१२॥

जगजीवनी मनमोहनी । जिवलगचि त्रिभुवनीं ॥१३॥

रुप एकाहुनी एक । रम्य लावण्यनाटक ॥१४॥

पहा एकचि अवयव । भुलविले सकळ जीव ॥१५॥

मन नयन चालवी । भगवती जग हालवी ॥१६॥

भोग देते भूमंडळीं । परि आपण वेगळी ॥१७॥

योगी मुनिजन ध्यानीं । सर्व लागले चिंतनीं ॥१८॥

भक्ति मुक्ति युक्ति दाती । आदिशक्ति सहज स्थिति ॥१९॥

सतरावी जीवनकळा । सर्व जीवांचा जिव्हाळा ॥२०॥

मुळीं रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनीं ॥२१॥

——– ——— ———- ———— ————–

अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचें स्वरुप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ॥ध्रु०॥

शक्तिविणें कोण आहे । हें तों विचारुनि पाहे । शक्तिविरहित न राहे । यशकीर्ति प्रताप ॥१॥

शिवशक्तीचा विचार । अर्धनारी नटेश्वर । दास म्हणे हा विस्तार । तत्त्वज्ञानी जाणती ॥२॥

——— ———– ———– ——— ———

जगदंबा जगदेश्वरी । श्रीराम अयोध्याविहारी । भक्तजनांसी उद्धरी । पार करी भवासी ॥१॥

शिवशक्तीचा विचार । साधु जाणती सारासार । अंतरीं स्मरावा रघुवीर । एका भावें करुनी ॥२॥

देव देवी अवघा एक । याचा करावा विवेक । नदी नद्या पुण्यदायक । सागरीं उदक एकचि ॥३॥

दास म्हणे सत्य वचन । एकचि देवी रघुनंदन । अवघा व्यापक आपण । साधुसंत जाणती ॥४॥

——— – – ————- ———- ———- –

तुकाई यमाई नमूं चडाबाई । जाखाई जोखाई सटवाई ते ॥१॥

सटवाई जगदंबा आदिशक्ति अंबा । तुम्हीं त्या स्वयंभा दाखवावें ॥२॥

दाखवावें तुम्हीं सर्वां पैलीकडे । देखतांचि घडे मोक्षपद ॥३॥

मोक्षपद घडे मोक्षासी पहातां । तद्रूपचि होतां दास म्हणे ॥४॥

—— ——– ———– ———– ——— ——–

जय देवी दुर्गा गौरी शंकरी
जय सर्वेश्वरी जय जगदीश्वरी ।
जय देवी दुर्गा गौरी शंकरी
जय सर्वेश्वरी जय जगदीश्वरी ।।

पार्वती भगवती हरिनारायणी
महिषासुर मर्दिनि भवानी ।
विद्यादायिनी सुविमल कामिनि
शाम्भवी शंकरी मोक्ष प्रदायिनी ।।
जय देवी दुर्गा गौरी शंकरी
जय सर्वेश्वरी जय जगदीश्वरी ।।

देवी भजन स्तुती
Tagged on:

Leave a Reply

Don`t copy text!
%d bloggers like this: